bank of maharashtra

जम्मू-काश्मिरात ३० ते ३५ पाकिस्तानी दहशतवादी

0

गोपनीय माहिती मिळताच सैन्याने सुरू केली शोध मोहिम

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या डोडा-खिस्तवाड भागात ३० ते ३५ पाकिस्तानी दहशतवादी लपून बसल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत गुप्तचर संस्थांकडून सूचना मिळताच भारतीय सैन्याने शोध मोहिम हाती घेतली आहे. माहितीनुसार, चिलाए कलांमधील हिवाळ्यात दहशतवादी डोडा-खिस्तवाडच्या उंच प्रदेशात लपतात. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या नॅशनल रायफल्स युनिट्सला उंच आणि धोकादायक भागात तैनात केले आहे. या युनिट्सना ड्रोन आणि थर्मल इमेजिंग उपकरणे देण्यात आली आहेत. चिलाए कलांमध्ये २१ डिसेंबर ते ३१ जानेवारीदरम्यान भयानक थंडी असते, तसेच डोडा-खिस्तवाडच्या उंच भागात जोरदार बर्फवृष्टी होते, पण लष्कर हिवाळी ऑपरेशन्ससाठी पूर्ण सज्ज आहे.विशेष म्हणजे पहलगाम नरसंहार करणारे पाकिस्तानी दहशतवादी देखील डोडा-खिस्तवाड मार्गाने दक्षिण काश्मीरच्या अनंतनागला पोहोचले होते, त्यामुळे लष्कर आता कोणतीही सुट्टी न देता कारवाई करण्यास सज्ज आहे.

लष्कराच्या सूत्रांनुसार, हिवाळ्यात दहशतवादी कारवाया कमी होतात, पण यावेळी रणनीती बदलून लष्कराने हिवाळ्यातही आपले ऑपरेशन वाढवले आहेत. यासाठी लष्करासोबत जम्मू-कश्मीर पोलिस आणि सीआरपीएफची मदत घेतली आहे. लष्कराने या भागात तात्पुरते बेस आणि सर्व्हिलन्स पोस्ट उभारल्या आहेत, ज्यामुळे दहशतवाद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवता येईल. मल्टी-एजन्सी इंटेलिजन्सवर आधारित दहशतवाद्यांच्या ठिकाणांची काटेकोरपणे ओळख करण्यात आली आहे.लष्कराचा उद्देश आहे की पोलिस आणि सीआरपीएफसोबत मिळून ज्वाइंट ऑपरेशन्स करून दहशतवाद्यांचा पूर्ण सफाया करणे. तसेच, दहशतवाद्यांना स्थानिक गावकऱ्यांपासून वेगळे करून त्यांची हालचाल नियंत्रित केली जाईल.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech