नवी दिल्ली : घनदाट धुके आणि कमी दृश्यतेमुळे मंगळवारी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर १० उड्डाणे रद्द करण्यात आली, तर २७० हून अधिक उड्डाणांना विलंब झाला. दिवसभरात ६ आगमन आणि ४ प्रस्थान उड्डाणे रद्द झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रस्थान उड्डाणांना सरासरी २९ मिनिटांचा विलंब नोंदवण्यात आला. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइट रडार २४ च्या माहितीनुसार, एकूण २७० पेक्षा जास्त उड्डाणे उशिराने रवाना झाली.दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (डायल) या विमानतळ संचालक संस्थेने ट्विटरवर (एक्स) दिलेल्या माहितीत सांगितले की, “विमानतळावरील दृश्यतेत हळूहळू सुधारणा होत आहे. मात्र, काही गंतव्यांसाठी उड्डाणांच्या प्रस्थानात विलंब होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय राजधानीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज सुमारे १,३०० उड्डाणांची ये-जा होते.
दिल्ली विमानतळावर धुक्यामुळे २७० उड्डाणांना विलंब, १० उड्डाणे रद्द
0
Share.
