चंदीगड : पंजाबमधील पटियाला येथील माजी आयपीएस अधिकारी आणि माजी आयजी अमर सिंग चहल यांनी सोमवारी (२२ डिसेंबर) स्वतःच्या छातीत गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला.यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे, ज्यामध्ये ऑनलाइन फसवणुकीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीचा उल्लेख आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी आयजी अमर सिंह चहल यांनी १२ पानांचे सुसाइड नोट लिहिले आहे. हे नोट त्यांनी पंजाब पोलिसांचे महासंचालक गौरव कपूर यांच्या नावाने लिहिले असून, त्यामध्ये सुमारे ८.१० कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीचा उल्लेख केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता पटियाला पोलीस करत आहेत.
पटियालाचे एसएसपी वरुण शर्मा यांनी मृत्यूची पुष्टी केली आणि सांगितले की हे प्रकरण आत्महत्या असल्याचे दिसून येत आहे आणि तपास सुरू आहे. अमर सिंग चहल हा २०१५ च्या फरीदकोट गोळीबार प्रकरणात आरोपी होता. २०२३ मध्ये, पंजाब पोलिसांच्या एसआयटीने या प्रकरणात माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, सुखबीरसिंग बादल आणि अनेक पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये चहलचे नाव देखील समाविष्ट होते.
