तातडीच्या प्रकरणांवर २२ डिसेंबर रोजी सुनावणी
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाला आगामी २ जानेवारीपर्यंत हिवाळी सुटी घोषीत करण्यात आली आहे. सुटीच्या कालावधीत तत्काळ सुनावणीसाठी वकिलांनी मागणी केली होती. अत्यावश्यक प्रकरणांच्या सुनावणीसाठी २२ डिसेंबर रोजी विशेष सत्र आयोजित करण्यात येईल असे सरन्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले. भारताचे सरन्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शुक्रवारी स्पष्ट केले की अत्यावश्यक प्रकरणांच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे विशेष अवकाशकालीन सत्र २२ डिसेंबर रोजी घेण्यात येईल. प्रकरणांची संख्या पाहून किती खंडपीठांची बैठक आवश्यक आहे, याचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.काही वकिलांनी न्यायालय हिवाळी सुट्टीसाठी बंद होण्यापूर्वी काही प्रकरणांची तातडीने सुनावणी करण्याची मौखिक विनंती केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. दरम्यान २२ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान सुप्रीम कोर्टाची हिवाळी सुट्टी राहणार आहे.
