bank of maharashtra

गुगल मॅप्स अ‍ॅपमध्ये नवीन पॉवर सेव्हिंग मोड उपलब्ध

0

मुंबई : गुगल मॅप्स अ‍ॅप मध्ये आता नवीन पॉवर सेव्हिंग मोड उपलब्ध झाला असून तो सुरुवातीला फक्त पिक्सेल १० सीरीजच्या स्मार्टफोनसाठी जारी करण्यात आला आहे. हा मोड नेव्हिगेशनदरम्यान बॅटरीची बचत करण्यासाठी खास तयार करण्यात आला आहे. नोव्हेंबर पिक्सेल फीचर ड्रॉप अंतर्गत हे फीचर प्रथम सादर झाले होते आणि आता अधिक यूजर्सपर्यंत पोहोचत आहे. या मोडमध्ये गुगल मॅप्स ब्लॅक-अ‍ॅण्ड-व्हाईट इंटरफेसवर स्विच होते, स्क्रीनची ब्राइटनेस व रिफ्रेश रेट कमी केला जातो आणि फक्त आवश्यक नेव्हिगेशन सूचना स्क्रीनवर दिसतात. त्यामुळे लांब ड्राइव्हमध्ये बॅटरीचा वापर लक्षणीयरीत्या कमी होतो.

हा पॉवर सेव्हिंग मोड केवळ Pixel 10, Pixel 10 Pro, Pixel 10 Pro XL आणि Pixel 10 Pro Fold या मॉडेल्सवरच कार्यरत आहे. तसेच तो फक्त ड्रायव्हिंग मोडमध्येच काम करतो. वॉकिंग किंवा बाइकिंग नेव्हिगेशनसाठी हा मोड उपलब्ध नाही. यूजर्सनी Google Mapsच्या सेटिंग्जमध्ये जाऊन Navigation पर्याय उघडावा आणि ड्रायव्हिंग सेक्शनमधील पॉवर सेव्हिंग मोड ऑन करून त्याची उपलब्धता तपासावी. नेव्हिगेशन सुरू झाल्यावर पावर बटण दाबल्यास लो-पॉवर मॅप व्ह्यू सक्रिय होतो. स्क्रीनला स्पर्श करून किंवा पुन्हा पावर बटण दाबून हा मोड बंद करता येतो, तर परत मोडमध्ये जाण्यासाठी पावर बटण एकदा दाबणे पुरेसे ठरते.

हा मोड मोबाईल वर्टिकल पोझिशनमध्ये असतानाच कार्यरत राहतो आणि डेस्टिनेशनवर पोहोचताच आपोआप बंद होऊन अ‍ॅप पुन्हा पूर्ण इंटरफेसवर परत येते. गूगलच्या मते, हा नवा पॉवर सेव्हिंग मोड स्टॅंडर्ड नेव्हिगेशनच्या तुलनेत बॅटरी लाइफ मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो आणि दीर्घ प्रवास करणाऱ्या यूजर्ससाठी तो उपयुक्त ठरणार आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech