bank of maharashtra

‘अवतार ३’ चित्रपटाची ५ डिसेंबरपासून एडवांस बुकिंग

0

मुंबई : हॉलिवुडचे प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरूनचा चित्रपट ‘अवतार: फायर अँड ऍश’ भारतीय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. अवतार फ्रँचायझीचा हा नवीन चित्रपट ‘अवतार: फायर अँड ऍश’ रिलीजसाठी देशभरातील आयमॅक्स थिएटर्समध्ये तयारी जोरात सुरू आहे.हा चित्रपट १९ डिसेंबरला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार असून एडव्हान्स बुकिंग ५ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. प्रोडक्शन कंपनी २०th सेंच्युरी ने त्यांच्या इंस्टाग्रामवर ही माहिती शेअर करत सांगितले, “प्रतीक्षा अखेर संपली ! आयमॅक्स वर ‘अवतार: फायर अँड ऍश’ साठी एडव्हान्स बुकिंग ५ डिसेंबरपासून सुरू होत आहे. सर्वोत्तम आयमॅक्स अनुभवासाठी लवकर या आणि आपल्यासाठी सर्वोत्तम सीट मिळवा.”

अवतार ३ हा चित्रपट १९ डिसेंबरला इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मलयाळम आणि कन्नड भाषेत सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दर्शकांचा उत्साह वाढवण्यासाठी रिलीजच्या आधी देशभरातील सर्व आयमॅक्स थिएटर्समध्ये अवतार थीम असलेले बॉक्स ऑफिस काउंटर तयार केले जातील. या काउंटरवर प्रेक्षक आपले तिकीट घेऊन फोटो क्लिक करू शकतील. ते मूव्ही मर्चंडाइज पाहू शकतील आणि रिलीजपूर्वीच ‘अवतार’ फॅनडमचा भाग होऊ शकतील.

दिग्दर्शक जेम्स कॅमेरूनचा चित्रपट ‘अवतार’ हा एक अ‍ॅक्शन-फँटसी चित्रपट आहे, जो २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड्स तोडले आणि प्रचंड कमाई केली. १३ वर्षांनंतर, २०२२ मध्ये या चित्रपटाचा सिक्वेल ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ प्रदर्शित झाला, ज्याने भारतासह संपूर्ण जगभरात करोडोंचा व्यवसाय केला आणि २०२२ ची सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

आता या ब्लॉकबस्टर फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट ‘अवतार: फायर अँड ऍश’ प्रदर्शित होणार आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘अवतार: फायर अँड ऍश’ ची पटकथा जेम्स कॅमेरूनने रिक जाफा आणि अमांडा सिल्वर यांच्यासोबत लिहिली असून ती दिग्दर्शितही केली आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा जेक सुली आणि नेतिरी यांची जोडी पाहायला मिळणार आहे, ज्यांचे पात्र सॅम वर्थिंगटन आणि झोई साल्डाने साकारले आहेत.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech