bank of maharashtra

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्याच्या जलसंपदा विभागाचा गौरव!

0

मंत्री विखे पाटील यांनी केला पुरस्काराचा स्विकार, पुरस्काराने अधिक काम करण्यासाठी पाठबळ- डॉ. विखे पाटील

मुंबई : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्याच्या जलसंपदा विभागाला “बेस्ट स्टेट कॅटेगरी २०२४ ” मध्ये प्रथम क्रमाकांच्या मानाच्या पुरस्काराचे वितरण दिल्ली मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले.राज्याचे जलसंपदा तथा अहील्यानगर जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुरस्काराचा स्विकार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २०२४ साली जलसंपदा विभागाची जबाबदारी होती.त्यांच्या कार्यकाळात विभागाने राज्याच्या जलव्यवस्थापन आणि सिंचन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्याचा सन्मान प्राप्त झाला आहे.

जलसंपदा विभागाच्या यशात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून होत असलेले नियोजन तसेच अतिशय पारदर्शकता,तांत्रिक सुधारणा आणि निर्धारीत वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर विशेष भर दिला आहे.धरण सुरक्षा,जलसंवर्धन सिंचन प्रकल्पांना गती आणि जलस्त्रोतांचा योग्य वापर यासर्व कामासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल महाराष्ट्राला केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने सन्मानित केल्याचे डॉ विखे पाटील म्हणाले.

महायुती सरकाच्या माध्यमातून सिंचन सुधारणा कार्यक्रमात सर्व प्रकल्पांची काम निर्धारीत वेळेत पूर्ण करण्यासाठी विभाग प्रयत्न करीत असून,विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी आशा नदीजोड प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजिदादा पवार जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व सहकारी मंत्र्याच्या सहकार्याने राज्यातील सिंचनाचे सर्व प्रकल्प निर्धारीत वेळेत पूर्ण करण्यासाठी आजच्या पुरस्काराचे मोठे पाठबळ असल्याची प्रतिक्रीया मंत्री विखे यांनी व्यक्त केली. विभागातील सर्व अधिकारी अभियंते आणि कर्मचारी यांचेही मोठे योगदान पुरस्कार मिळ्ण्यात असल्याचा उल्लेख मंत्री विखे पाटील यांनी आवर्जून केला.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech