bank of maharashtra

इस्रायल भारताला तीन नवीन क्षेपणास्त्रे देणार

0

नवी दिल्ली : इस्रायल अलीकडील एका करारानुसार भारताला तीन नवीन क्षेपणास्त्रे देणार आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण सहयोग अधिक बळकट होऊन नवीन उंचीवर पोहोचेल. इस्रायल आणि भारत यांच्यातील संरक्षण सहयोग घट्ट करण्यासाठी गेल्या आठवड्यात दोन्ही देशांच्या संरक्षण सचिवांनी एका महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी केली. यासाठी भारतीय संरक्षण मंत्रालयाचे एक प्रतिनिधिमंडळ गुप्तरीत्या इस्रायलमध्ये गेले होते. हा करार भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या प्रतिनिधिमंडळाच्या इस्रायलच्या गुप्त भेटीदरम्यान झाला.

या कराराअंतर्गत इस्रायल आपल्या तीन शक्तिशाली क्षेपणास्त्रे भारताला हस्तांतरित करणार आहे. या क्षेपणास्त्रांचे भारतातही निर्माण करण्यात येणार आहे. भारत इस्रायलच्या संरक्षण-निर्यातीचा सर्वात मोठा ग्राहक आहे. २०२० ते २०२४ या कालावधीत इस्रायलच्या एकूण संरक्षण विक्रीचा सुमारे ३४ टक्के हिस्सा एकट्याने भारताने खरेदी केला.

अहवालानुसार, या एमओयूअंतर्गत भारत केवळ इस्रायल एयरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI) च्या ‘एअर लौरा’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची आणि राफेल अॅडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टम्सच्या ‘आइस ब्रेकर’ क्रूझ क्षेपणास्त्रांची खरेदीच नाही तर त्यांचे उत्पादनही करू शकणार आहे. भारत ‘आइस ब्रेकर’ क्रूझ क्षेपणास्त्रामध्येही स्वारस्य दाखवत आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे ३०० किमी आहे. हे जमिनीवरील तसेच समुद्री लक्ष्यांवर कार्य करते आणि इलेक्ट्रॉनिक युद्धपरिस्थितींमध्येही प्रभावी राहते.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech