bank of maharashtra

राजस्थान, गुजरातमधून कांद्याची आवक वाढली, भाव आणखी कोसळणार?

0

लासलगाव : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्ये आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांकडे अद्याप मोठ्या प्रमाणात जुना रब्बी कांद्याचा साठा आहे. त्यात कर्नाटकातील खरीप कांद्याची काढणी सुरू झाली असून, लवकरच राजस्थान व गुजरातमधूनही नवीन कांद्याचा पुरवठा वाढेल.या सर्व घटकांमुळे बाजारात कांद्याचा बंपर स्टॉक उपलब्ध होणार असून, त्यामुळे भाव आणखी कोसळू शकतात, असा इशारा कांदा निर्यातदारांनी दिला आहे.

यंदा उशिराने लागवड झाल्याने खरीप कांद्याचे पीक नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर बाजारात येण्याची शक्यता आहे. सध्या कर्नाटकातील कांद्याची आवक सुरू असून, ती नोव्हेंबर भारतीय कांदा बियाण्यांची निर्यातही दीर्घकालीन संकट निर्माण करत आहे. बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि इतर शेजारी देश भारतीय कांदा बियाण्यांचा वापर करून स्वतः चे उत्पादन वाढवत आहेत. चीन आणि पाकिस्तानमध्येही भारतीय कांद्याच्या बियाण्यांची मागणी वाढत आहे. यामुळे भविष्यात भारताचा कांदा निर्यात बाजार धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने तत्काळ कांदा बियाण्यांच्या निर्यातीवर बंदी घालावी, अशी मागणी कांदा निर्यातदार संघटनेने केली आहे.

कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही. दुसरीकडे बाजारात साठा वाढल्यामुळे व्यापाऱ्यांकडे खरेदीसाठी दडपण येत आहे. शेतकऱ्यांनी सध्या जुना साठा सुरक्षित ठेवण्यासाठी हवेशीर कोठारे वापरणे, तसेच विक्रीसाठी बाजारभावावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech