bank of maharashtra

पॅरिस डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राला वेबरचे आव्हान

0

पॅरिस : यंदाच्या पॅरिस डायमंड लीगमध्ये ज्युलियन वेबर विरुद्ध नीरज चोप्रा यांच्यातील सामना क्रीडाप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. दोहा येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये नीरजने ९०.२३ मीटर भालाफेक करत पहिल्यांदाच ९० मीटरचं अंतर पार केलं होतं. जर्मनीच्या ज्युलियन वेबरनेही पहिल्यांदाच ९० मीटरचा भाला याच स्पर्धेत फेकला होता. त्याने ९१.०६ मीटर भाला फेकत दोहा डायमंड लीगमध्ये सुवर्णपदाकावर आपलं नाव कोरलं होतं.

गेल्या वर्षी वेबरने पॅरिस डायमंड लीग ही स्पर्धा जिंकली होती. तर २०१७ नंतर भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा पहिल्यांदाच पॅरिस डायमंड लीगमध्ये सहभागी होणार आहे. पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमचे आव्हानही नीरज चोप्राला या स्पर्धेत असणार आहे. कारण २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अर्शदनेच नीरजचं सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न साकार होऊ दिलं नव्हतं.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech