bank of maharashtra

इस्राइलशी संघर्ष संपला, इराणकडून युद्धविरामाची घोषणा

0

तेहरान : इस्राइल आणि इराणमध्ये मागच्या १२ दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील युद्धविरामाचा दावा केल्यानंतरही इराणकडून इस्राइलच्या दिशेने हल्ले करण्यात आल्याने तसेच युद्ध सुरू ठेवण्याचे जाहीर करण्यात आल्याने युद्धविरामाबाबत संभ्रम निर्माण झाला होता.मात्र या गोंधळानंतर अखेरीस इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून युद्धविरामाची अधिकृतरीत्या घोषणा करण्यात आली आहे. तर इस्राइलनेही इराणच्या हल्ल्यांबाबत दिलेला अलर्ट मागे घेतला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने इस्राइल आणि इराण हे युद्धविरामासाठी राजी झाले होते. मात्र युद्धविरामाच्या घोषणेनंतरही इराणकडून इस्राइलवर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे युद्धविरामाबाबत साशंकता निर्माण झाली होती. इराणने तासाभरात तीन क्षेपणास्त्र हल्ले केल्याचे इस्राइल डिफेन्स फोर्सकडून सांगण्यात आले. या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला.दरम्यान, हा हल्ला झाल्यानंतर इराणने युद्धविराम लागू केला आहे. तसेच या संघर्षातील अखेरचा हल्ला आपण केल्याचा दावा इराणने केला जात आहे. या हल्ल्यापूर्वी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी आमचं शक्तिशाली लष्कर अखेरपर्यंत इस्राइलला त्याच्या हल्ल्यांची शिक्षा देईल, असे सांगितले होते.

गेल्या १३ जून रोजी सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत इराण आणि इस्राइलमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. त्यात इ्स्राइल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणमधील फोर्डो, नतांज आणि इस्फहान या अणुकेंद्रांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याशिवाय इस्राइलने केलेल्या हल्ल्यात इराणमधील अनेक संशोधक आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या युद्धात इस्राइलला त्याच्या शेजारील आणि मित्रदेशांकडूनही म्हणावी तशी साथ मिळाली नाही. रशिया आणि चीनने नैतिक पाठिंबा दिला पण तेही सक्रियपणे इराणच्या पाठीशी उभे राहिले नाहीत.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech