bank of maharashtra

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या गुडघ्याची झाली सर्जरी

0

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट्स देत असते. सध्या प्रार्थनाच्या चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. प्रार्थनाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याशिवाय तिच्या पायाची सर्जरीही करण्यात आली आहे. प्रार्थनाने स्वत: पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिच्या पायाला दुखापत झाल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीच्या गुडघ्याची सर्जरी झाली आहे. “पुढच्या काही आठवड्यांसाठी मला हेच पाहावं लागेल. कोणतीही तक्रार नाही. गुडघ्याची सर्जरी झाली आहे”, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रार्थनाची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तर अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत सेलिब्रिटींनी तिला लवकर बरं होण्यासाठी आणि काळजी घेण्यास सांगितलं आहे.

प्रार्थनाने काही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. प्रार्थनाने पवित्रा रिश्ता मालिकेतून अभिनयातील करिअरची सुरुवात केली. ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘फुगे’, ‘व्हॉट्स अप लग्न’, ‘बाई गं’ अशा सिनेमांमध्ये ती झळकली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही प्रार्थनाची मालिका प्रचंड गाजली. या मालिकेत तिने श्रेयस तळपदेसोबत मुख्य भूमिका निभावली होती.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech