bank of maharashtra

कल्याण पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक ५ गौरीपाडा मधील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या भूमिपूजन सोहळा संपन्न

0

राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी आमदार नरेंद्र पवार आणि युवासेना जिल्हा चिटणीस वैभव विश्वनाथ भोईर यांची प्रमुख उपस्थिती

कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 5 मधील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा रविवारी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी आमदार नरेंद्र पवार आणि युवासेना जिल्हा चिटणीस वैभव विश्वनाथ भोईर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. कल्याण पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक ५ गौरीपाडा येथील वृंदावन रेसिडेन्सी ते साई चौक योगीधाम पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधीतून ५० लाख आणि विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून १ कोटी रुपयांचा विकासनिधी यासाठी प्राप्त झाला आहे.

या संयुक्त निधीच्या माध्यमातून याठिकाणी आता सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम केलं जाणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यात राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी आमदार नरेंद्र पवार, युवासेना जिल्हा चिटणीस वैभव विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. तर यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी दया गायकवाड यांच्या प्रभागातील कामाची स्तुती केली. तसेच कोविड काळामध्ये त्यांनी केलेल्या कामाचीही यावेळी विशेष आठवण करून देत कौतुकाची थाप दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला भाजपा १३८ विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे, भगवान म्हात्रे, श्याम मिरकुटे, नरेंद्र सिंग, पप्पू मिश्रा यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech