bank of maharashtra

कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा, लहान होड्यांना समुद्रात न जाण्याचा सूचना

0

मुंबई : कोकण किनारपट्टीला आज(दि.२३) सायंकाळी ५.३० वाजल्यापासून दिनांक २५ जून २०२५ रोजीचे रात्री ८.३० वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रातर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.त्यामुळे राज्य सरकारकडून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.तसेच राज्यात पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज(दि.२३) सायंकाळपासून २५ जून रात्रीपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रातर्फे कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.त्यामुळे राज्य सरकारकडून लहान होड्यांना २५ जूनपर्यंत समुद्रात न जाण्याच्या इशारा देण्यात आला आहेत.तर येत्या मंगळवारी २४ जूनपासून अकोला, नागपूरसह विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उद्या, २४ जूनपासून पुढील पाच दिवस, म्हणजे शनिवार २८ जूनपर्यंत विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती, वर्धा, बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे.

राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे. ठाणे जिल्ह्यात पुरात वाहून एक व खड्ड्यामध्ये बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पुणे जिह्यात नदीत वाहून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये पालघर जिल्ह्यात ७३.३ मिमी पाऊस झाला आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३६.४, रत्नागिरी जिल्ह्यात २५.८ मिमी, ठाणे जिल्ह्यात १४.३ आणि कोल्हापूर जिल्ह्यात १३.९ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, राज्यात रविवार(दि.२२) पासून आज २३ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारीत ठाणे १४.३, रायगड १०.७, रत्नागिरी २५.८, सिंधुदुर्ग ३६.४, पालघर ७३.३, नाशिक ६.२, धुळे ०.५, नंदुरबार २.९, जळगाव ०.९, अहिल्यानगर ०.२, पुणे ४.३, सोलापूर ०.१, सातारा ४.७, सांगली २.८, कोल्हापूर १३.९, छत्रपती संभाजीनगर १, जालना १.१, धाराशिव ०.२, नांदेड ०.३, हिंगोली ०.४, बुलढाणा १.१, अकोला ३.४, वाशिम ०.४ अमरावती ०.५, यवतमाळ ०.६, वर्धा ०.२, नागपूर १.५, भंडारा ०.६, गोंदिया १.७, चंद्रपूर २.५ आणि गडचिरोली जिल्ह्यात ६.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech