bank of maharashtra

टॅरिफ प्रकरणी भारताची भूमिका कौतुकास्पद- देवेगौडा

0

बंगळुरू : अमेरिकेने भारतावर लादलेल्या जास्तीच्या टॅरिफ प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या भूमिकेचे माजी पंतप्रधान आणि जेडीएस नेते एच.डी. देवगौडा यांनी कौतुक केले आहे. देवगौडा यांनी मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, अमेरिकेच्या अन्यायकारक टॅरिफ वॉरनंतर तुम्ही त्वरित नव्या पर्यायांचा शोध घेतला, हे लाखो भारतीयांसाठी दिलासा देणारे आहे. त्यांनी मोदींच्या जपान आणि चीन भेटी देशासाठी निश्चितच फायदेशीर ठरतील. ‘मल्टी-अलाइनमेंट’ धोरण भारताला निकट भविष्यकाळात अत्यंत फायदेशीर ठरेल. ही धोरणे पूर्वीच्या गुटनिरपेक्ष धोरणाच्या तुलनेत अधिक रचनात्मक आणि सकारात्मक आहे. पंतप्रधान मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत दिसलेले फोटो आणि व्हिडीओ केवळ सौहार्दाचं प्रतीक नसून जागतिक व्यूहमांडणीच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे, ज्यात भारत केंद्रस्थानी असल्याचे देवेगौडा यांनी म्हंटले आहे.

यूक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी मोदींनी पुतिन यांच्याशी संवाद साधल्याबद्दल देवगौडांनी त्यांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले, “भारताच्या शब्दांना जागतिक पातळीवर अधिक गंभीरतेने घेतले जाते, कारण त्यामागे ऐतिहासिक मूल्ये आणि प्रामाणिकपणा आहे. आज देश अत्यंत नाजूक टप्प्यावर उभा आहे. त्यासाठी प्रचंड संयम आणि आत्मविश्वास आवश्यक आहे, आणि देवाने ते आपल्याला भरभरून दिले आहे. ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य आणि अधिक शक्ती देवो असे देवेगौडा यांनी नमूद केले आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech