bank of maharashtra

संजय दत्तने दिल्या ‘सन ऑफ सरदार २’चित्रपटाला शुभेच्छा

0

मुंबई : अभिनेता अजय देवगण याची मुख्य भूमिका असलेला सन ऑफ सरदार २ या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा नवा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता संजय दत्तने एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाला शुभेच्छा देताना त्याच्या मनातील भावना लिहिल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर ‘सन ऑफ सरदार २’ चा दुसरा ट्रेलर शेअर करताना संजय दत्तने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘सन ऑफ सरदार २ साठी राजूचे अभिनंदन, जर आपण ते एकत्र केले असते तर ते अधिक मजेदार झाले असते.’ संजय दत्तच्या या पोस्टवर अनेक युजर्स कमेंट करत आहेत.
‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटातील काही कलाकार बदलण्यात आले आहेत. यामध्ये सन ऑफ सरदारच्या पहिल्या भागात असलेला अभिनेता संजय दत्त हा नसणार आहे. ’सन ऑफ सरदार २’ या चित्रपटाची रिलीज डेट सैयारा या चित्रपटाला वाढता प्रतिसाद पाहता पुढे ढकलण्यात आली होती. आता १ ऑगस्ट २०२५ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech