bank of maharashtra

छत्रपतींचे १२ किल्ले वर्ल्ड हेरिटेजमध्ये , पंतप्रधान व्यक्त केला आनंद

0

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. ‘प्रत्येक भारतीय या सन्मानाने आनंदित झाला आहे’, अशा भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “प्रत्येक भारतीय ह्या सन्मानाने आनंदित झाला आहे. या मराठा मिलिटरी लँडस्केप्समध्ये १२ भव्य किल्ल्यांचा समावेश आहे. यापैकी ११ महाराष्ट्रात आहेत, १ तामिळनाडूमध्ये आहे.” जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा आपण त्याचा संबंध सुशासन, लष्करी ताकद, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक कल्याणावर भर देण्याशी जोडतो. कोणत्याही अन्यायापुढे न झुकण्याच्या त्यांच्या वृत्तीने हे थोर शासक आपल्याला प्रेरणा देतात”, अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या. पुढे बोलताना ते म्हणाले की, “मी सर्वांना आवाहन करतो की, या किल्ल्यांना भेट द्या आणि मराठा साम्राज्याचा समृद्ध इतिहास जाणून घ्या”, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यानिमित्ताने जनतेला केले आहे.

युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यासह ११, तर तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये किल्ले शिवनेरी, स्वराज्याची राजधानी राजगड व रायगड यांच्यासह साल्हेर, लोहगड, खांदेरी, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील, तर तामिळनाडूतील जिंजी या किल्ला आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech