bank of maharashtra

शुभांशू शुक्ला १५ जुलै रोजी पृथ्वीवर परतण्याची शक्यता – इस्त्रो

0

नवी दिल्ली : ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतण्याची तयारी करत असताना भारताच्या अंतराळ मोहिमेत एक यशस्वी अध्याय जोडला जाणार आहे. हवामान अनुकूल असल्यास ते १५ जुलै रोजी कॅलिफोर्निया जवळील समुद्रात उतरणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय आहेत. आकाश गंगा नावाचे हे अभियान अ‍ॅक्सिओम स्पेस, नासा आणि इस्रो यांचे संयुक्त प्रयत्न आहेत. हे अभियान आगामी गगनयान मोहिमेसह आणि भारतीय अंतराळ स्थानकासह भारताच्या मानवी अंतराळ उड्डाणाला नवी चालना देणार आहे.

अ‍ॅक्सिओम स्पेसने माहिती दिली की, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात १७ दिवस राहिल्यानंतर आणि काम केल्यानंतर अ‍ॅक्सिओम मिशन ४ चे कर्मचारी त्यांचे संशोधन प्रकल्प पूर्ण करत आहेत. याठिकाणी आल्यापासून त्यांनी ६० हून अधिक वैज्ञानिक संशोधन उपक्रम राबवले आहेत. २० हून अधिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. या सर्व प्रकल्पांमुळे अशा संशोधनाला चालना मिळाली आहे जी, अंतराळ संशोधनाच्या भविष्यात योगदान देईल आणि पृथ्वीवरील भावी पिढ्यांनाही प्रेरणा देईल.

पुढील विश्लेषणासाठी हे प्रयोग आता पृथ्वीवर परतण्याची तयारी करत आहेत. दरम्यान, सूक्ष्म शैवाल, पीक बियाणे आणि व्हॉयेजर प्रदर्शनावर केंद्रित असलेले इतर तीन प्रयोग पूर्णत्वाच्या जवळ आले आहेत. आणि भारताच्या अंतराळ संशोधनाला बळकटी देतील. या सर्वांमध्येइस्रोचे फ्लाइट सर्जन संपूर्ण मोहिमेदरम्यान ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या आरोग्यावर आणि मानसिक आरोग्यावर सतत लक्ष ठेवून आहेत. अहवालांनुसार अंतराळवीरांची तब्येत चांगली आहे आणि ते उत्साही आहेत. स्प्लॅश डाउन झाल्यानंतर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला इस्रोच्या फ्लाइट सर्जनच्या देखरेखीखाली सात दिवसांच्या क्वारंटाइन प्रोग्राममधून जातील. अंतराळात अनेक आठवडे घालवल्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी हा टप्पा आवश्यक आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech