मुंबई : केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात एका धाडसी महिला वन अधिकाऱ्याने किंग कोब्राला अवघ्या ६ मिनिटांत मुक्त करत त्याची सुटका केली.या महिला अधिकाऱ्याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यानेही या अधिकारी महिलेच्या धाडसाचे कौतुक केले आहे. वन अधिकारी रोशनी हिचे कौतुक करताना ”उत्साही, धाडसी आणि निडर राहणं हेच रोशनीच्या दिवसभरातील कामाचं मूल्यमापन आहे” असे कौतुक सचिनने केले आहे. सचिन तेंडुलकरने रोशनीच्या या धाडसाला सलामीदेखील केला आहे. तसेच, आपल्या एक्स अकाऊंटवरुन सचिनने राजन मेढेकर यांनी शेअर केलेला व्हिडिओ रिट्विटही केला आहे.
केरळच्या पेप्पारा अंकुमारुथुमूत निवासी भागात जंगलातील ओढ्यात आंघोळ करताना स्थानिकांना हा किंग कोब्रा दिसला होता. रोशनी यांनी अत्यंत धाडसाने त्या किंग कोब्राला रेस्क्यू केले.रोशनी यांनी केलेल्या बचाव मोहिमेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्या अतिशय काळजीपूर्वक किंग कोब्राला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडत आहेत. कोणतीही घाई न करता रोशनी यांनी किंग कोब्राची सुटका केली.